Sunday, 29 April 2018

Acupressure point









तुळस

तुळस
--------------
शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सँक्टम;
 इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल)
ही लेबियाटी  म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे.
आशिया, युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात.
हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुर्‍यासारख्या फुलानां मंजिरी म्हणतात. त्यांतूनच तुळशीच्या बिया मिळतात.

-----------------------------
हिंदू धर्मातील स्थान
------------------------------

हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी-वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. अनेकजण,विशेषतः हिंदू स्त्रिया नित्य नियमाने तुळशीची पूजा करतात.
त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षणा घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते.

 वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात.

 हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुलसीपत्र ठेवले जाते.

 देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानाचा वापर करतात
देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानांचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोहचतो अशी धारणा आहे
-----------------------------------------------
"तुळशीचे पान. एक त्रैलोक्य समान
----------------------------------------------

उठोनिया प्रातःकाळी,
वंदी तुळशी माऊली
नाही आणिक साधन,
एक पूजन तुळशीचे
न लगे तीर्थाधना जाणे,
नित्य पूजने तुळशीसी
योगायोग न लगे काही,
 तुळशीवाचुनी देव नाही"

अशाप्रकारे संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.
एकंदरीत भारतीय समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे.
समुद्रमंथनातून जेंव्हा अमृत निघाले तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते.
----------------------------------
 तुळशीचे औषधीय गुण
----------------------------------
भारतीय समाजात तुळशीला एवढे मानाचे स्थान देण्याचे कारण तुळस ही औषधी वनस्पती आहे.
◆ ती आपल्या उच्छवासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते, त्यामुळे हवा शुद्ध रहाते
◆ ती कफनाशक व पाचक आहे सर्दी, पडसे, कफ, खोकला, दमा यावर तुळशीचा काढा अत्यंत गुणकारी आहे.
◆ तुळशीची पाने, आले व गूळ पाण्यात उकळवून हा काढा केला जातो. चहा कॉफी ऐवजी तो पिणे अधिक चांगले
◆ तुळशीची पाने जेवल्यानंतर चावून खाल्यास पचन चांगले होते.
◆तुळशीरस नियमित सेवन केल्यास मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते. रक्तातील, कोलस्ट्रोल कमी होते.
◆कोलायटिस, अंग दुखणे, सर्दी पडसे, पांढरे काडे, मेदवृद्धी, डोकेदुखी यावर तुळस गुणकारी औषध आहे.
◆उचकी लागल्यास तुळशीची पाने खावीत स्मरणशक्ती वाढवण्यास तुळस उपयुक्त आहे
◆ तुळशीच्या मंजिर्‍या म्हणजे तुळशीची फुले त्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. त्याचे पाणी, दुध, साखर एकत्र करून प्यायल्यास लघवी स्वच्छ होत.